अवयवदात्यांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

ब्रेनडेड झालेल्या रुग्णांचे अवयवदान केले जातात. पण अजुनही अंधश्रद्धेत समाज गुरफटलेला आहे.त.त्यामुळे अवयवदानासाठी अजुन फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यासाठी जनजागृतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. या चळवळीला बळ देण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने अवयवदात्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याचे ठरविले आहे.

महाराष्ट्रातील १५० ब्रेनडेड झालेल्या व्यक्तींनी अवयवदान करून अनेकांना जीवदान दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळल्यानंतर त्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. देशात अवयदान करण्यात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या अवयवदानाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. कारण अवयवांची गरज असलेल्या रुग्णांची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. एकाने अवयवदान केल्यास त्याचा फायदा दोन ते तीन रुग्णांना होतो. गेल्या वर्षी १४९ ब्रेन डेड रुग्णांचे अवयवदान करण्यात आले. यंदा जानेवारी २०२४ मध्ये अवयवदात्यांचा टप्पा १५० इतका झाला आहे.

error: Content is protected !!