आंतर महाविद्यालयीन निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

शहाजी महाविद्यालयात श्रीपतराव बोंद्रे आणि विजयराव बोंद्रे बापू यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. आयोजन केले आहे.

महाविद्यालयाच्या महर्षी वी. रा. शिंदे सभागृहात स्पर्धा होणार आहेत. कृत्रिम बुद्धी, पर्यावरणीय आव्हाने,शाश्वत पर्यावरण, समाजमाध्यमे, आजचा तरुण, नवीन शैक्षणिक धोरण, व्यसनाचा विळखा हे स्पर्धेचे विषय आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील इच्छुक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी केले आहे

error: Content is protected !!