यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात अंतरराष्ट्रीय हिंदी वैश्विक प्रश्नावली उपक्रमाचे आयोजन

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने ‘विश्व हिंदी दिवस आणि पंधरवड्या’ निमित्त आयोजित केलेल्या अंतरराष्ट्रीय हिंदी वैश्विक प्रश्नावली ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हिंदी भाषा, प्रचार- प्रसार या उद्देशाने आयोजित या उपक्रमात देश विदेशातील ४०० हून अधिक संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला.

 महाविद्यालयाचा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, शिवाजी विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषद, संशोधक विचार महासंघ, अंतरराष्ट्रीय हिंदी संघटन, नेदरलँड यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर्जालीय माध्यमातून आयोजित या उपक्रमास श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आ. डाॅ. विनय कोरे- सावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही.व्ही. कारजीनी , प्राचार्य डॉ. ए.एम. शेख यांनी शुभेच्छा दिल्या.

10 जानेवारी, विश्व हिंदी दिवसाच्या निमित्ताने आयोजित वैश्विक प्रश्नावली चा शुभारंभ नेदरलँड येथील हिंदीच्या संशोधक, अभ्यासक आणि अंतरराष्ट्रीय हिंदी संघटन संस्थेच्या अध्यक्ष डॉ. ऋतु शर्मा- पांडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेश प्रयागराज येथील प्रसिद्ध भाषा- विज्ञानी आणि ज्येष्ठ समीक्षक आचार्य पंडित पृथ्वीनाथ पांडे, हैदराबाद येथील बुद्रुका महाविद्यालयातील हिंदीच्या समीक्षक संपादिका प्रा. सुषमा देवी, शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुनील बनसोडे यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस महत्त्व, प्रचार प्रसार आणि वैश्विक स्तरावरील हिंदीचे वाढते महत्त्व या विषयावरील माहिती आणि मनोगत त्यांनी सादर केले. संयोजक प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले.

 नेदरलँड, सूरीनाम, चीन देशातील विद्वानांनीही प्रश्नावलीच्या माध्यमातून सहभाग नोंदविला. देशभरातील ४०० हून अधिक अभ्यासकांनी वैश्विक हिंदी स्थिती आणि विश्व हिंदी संमेलन संदर्भात देण्यात आलेल्या लेखांच्या अभ्यासानंतर गुगल फॉर्मच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या प्रश्नावली ला उत्तर देऊन प्रमाणपत्र ही प्राप्त केले.

  उपक्रम यशस्वी करण्यासाठी 'नॅक', चे समन्वयक डॉ. एस. एस. खोत, डॉ. संतोष जांभळे, डॉ. सी. आर. जाधव यांनी तांत्रिक सहाय्य प्रदान केले.

स्वागत – प्रास्ताविक, संयोजक डॉ.प्रकाश चिकुर्डेकर यांनी केले. सहसंयोजक प्रा. मोहन सणगर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!