दत्त जयंती निमित्त जवाहरनगर परिसरा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

शिक्षक कॉलनी, जवाहर नगर परिसरातील श्रीदत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, श्री दत्त मंदिर प्रतिष्ठापना मंडळाच्या माध्यमातून होत असलेल्या कार्यक्रमात शुक्रवार २२ रोजी सायंकाळी ४ ते ७ पालखी सेवा, सायंकाळी ७ वाजता श्री घराणे प. पू. डॉ. संजयपंत (अक्कोळ), सुधाकर मणेरे व भक्तगणांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन उत्सवास सुरुवात होईल.
श्री सद्गुरू पंत महाराज यांच्या चरित्र ग्रंथाचे पारायण अण्णासो जाधव यांच्या अधिपत्याखाली सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत होणार आहे. तर शुक्रवार २२ रोजी श्री महालक्ष्मी भजनी मंडळ, शनिवार २३ रोजी श्री पंत प्रतिष्ठापना मंडळ, रविवार २४ रोजी श्री पंत अवधूत भजनी मंडळ, सोमवार २५ रोजी श्री बालावधुत भजनी मंडळ यांची रोज रात्री ९ ते ११ या वेळेत भजन सेवा होणार आहे. त्याच बरोबर मंगळवार २६ रोजी सकाळी ७ ते ९.३० परायणाची सांगता होणार असून दुपारी ३ ते ५ दत्त मंदिर भजनी मंडळ यांची भजन सेवा व सायंकाळी ५.३० वा. दत्त जन्म काळ, पुष्पवृष्टी, सुंठवडा व प्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी सर्व कार्यक्रमास नागरिक व भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!