इचलकरंजी/प्रतिनिधी : बि.बि.एन. आणि बहुउद्देशीय ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी येथे रविवारी (20ऑगस्ट) राम जानकी हॉलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये शुगर, हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल, ब्लड ग्रुप रॅपिड टेस्ट मोफत करण्यात येणार आहेत. त्यासोबतच नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिराचे देखील आयोजन केले आहे. शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून फीजिओ थेरेपी बाबत वैद्यकीय सल्ला दिला जाईल. हे शिबिर राम जानकी हॉल, नदीवेस रोड, इचलकरंजी येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित केले असुन इचलकरंजी शहरासह परिसरातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.