संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावर “युरेका-२४ तांत्रिक प्रकल्प स्पर्धेचे” आयोजन

जयसिंगपूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे (कोल्हापूर) येथे बुधवार दिनांक २० मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० ते ५.०० या वेळात डिप्लोमा अभियांत्रिकी मधील पदविका अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “राष्ट्रीय स्तरावरील युरेका-२४ प्रकल्प स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे. कोणतेही विभागाचे डिप्लोमा अंतिम वर्षाचे विद्यार्थी या प्रकल्प स्पर्धेचे सहभागी होऊ शकतात, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही.

पॅरामीटर्स तंत्रज्ञानाची निवड, प्रकल्पाचा सामाजिक प्रभाव, इको-फ्रेंडली/उपलब्ध संसाधने आणि साहित्याचा सर्वोत्तम वापर, प्रोटोटाइप/वर्किंग मॉडेल/व्हर्च्युअल मॉडेल/मॉकअप मॉडेल, प्रकल्पाची सौंदर्य आणि पूर्णता, कल्पकता आणि नाविन्यपूर्णता, वापरकर्ता अनुकूल कार्यक्षमता. यातुन मूल्यांकनाच्या प्रोजेक्ट निवडीसाठी वापर केला जाणार आहे, विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पास मूल्यांकन करून बक्षीस देण्यात येतील प्रथम बक्षीस २५,००० हजार प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह, दुसरे बक्षित १५,००० हजार प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह, तिसरे बक्षीस १०,००० हजार प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह आणि सर्व सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येईल.

या स्पर्धेत जास्तीतजास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट व्ही. गिरी यांनी केले आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. नितीन पाटील, प्रा. सागर चव्हाण, प्रा. स्वप्नील ठिकने, प्राध्यापिका रईसा मुल्ला, सर्व विभागाचे विभागप्रमुख आणि संपूर्णटीम परिश्रम घेत आहेत.

या स्पर्धेस यशस्वी आयोजन करण्याकरिता संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री. संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. विराट व्ही गिरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!