संजय घोडावत आयटीआय मध्ये  पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन 

 “३५० विद्यार्थ्याची टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल लिमिटेड पुणे  कंपनीत निवड…”


तांत्रिक कौशल्य शिक्षण क्ष्रेत्रात  आपले नाव महाराष्ट्राच्या  कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या  संजय घोडावत आयटीआय  येथे नुकताच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल लिमिटेड पुणे यांच्या अंतर्गत पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह  आयोजित करण्यात आला होता.  यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, जिल्ह्यातील आयटीआय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.  या कंपनीने ३५० विद्यार्थ्यांना इंटरशिप व जॉबसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.  दरवर्षी संजय घोडावत आयटीआय मध्ये  अनेक राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात.


टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल लिमिटेड, पुणे  एक प्रख्यात कंपनी असून भारतभर तसेच विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रात या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे.

नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांच्या निवड करण्यात आली आहे.  या निवडीसाठी आयटीआयचे  प्रा. स्वप्निल थिकणे, अविनाश पाटील,  यांचे सहकार्य लाभले.

या गुणवंत विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी, यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!