संजय घोडावत पॉलीटेक्नीक मध्ये एआयसीटीई व आयएसटीई पुरस्कृत कार्यशाळेचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी

   संजय घोडावत पॉलीटेक्नीक( Sanjay Ghodawata Polytechnic) मध्ये ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) व इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE ) पुरस्कृत ” ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स” या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील रिफ्रेशर कार्यशाळेचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यात आले. या कार्यशाळा आयोजनाचा मान कोल्हापूर जिल्ह्यातून संजय घोडावत पॉलीटेक्नीक मिळाला आहे. कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ही कार्यशाळा  १९ ते २५ फेब्रुवारी, ५ ते ११ मार्च आणि १२ ते १८ मार्च या तीन आठ्वड्यामध्ये ऑनलाईन तीन टप्प्यात घेण्यात आली. या कार्यशाळेस देशभरातील ३०० शिक्षकांनी आपला सहभाग नोंदविला होता.
    या कार्यशाळेचे उदघाटन एआयसीटीई चे संचालक कर्नल बी व्यंकट व आयएसटीई चे अध्यक्ष डॉ. पी के देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याबाबत बोलताना प्राचार्य श्री.विराट गिरी म्हणाले ” एआयसीटीई व आयएसटीई या तंत्रशिक्षण क्षेत्रातील नामवंत संस्था असून या कार्यशाळेच्या आयोजनाचा मान आम्हाला मिळाल्याबद्दल या संस्थांचे आभार व्यक्त करतो, या कार्यशाळेमुळे देशभरातील शिक्षकांना मोठ्याप्रमाणात फायदा होणार आहे. कॉम्प्युटर जगतातील अद्यावत ज्ञान आत्मसात करणे आणि शिक्षकांच्या संघटनात्मक शैक्षणिक कौशल्यांमध्ये संवाद साधणे आणि परस्पर विनिमय करण्याची संधी मिळवणे हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते.
    ही कार्यशाळा यशस्वीरीत्या आयोजित करण्यासाठी या कार्यशाळेचे समन्वयक व कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्रमुख प्रा.सागर चव्हाण व टीम यांनी अथक परिश्रम घेतले.
    या आयोजनाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री संजयजी घोडावत, विश्वस्त श्री. विनायक भोसले व प्राचार्य श्री. विराट गिरी यांनी सर्वांचे अभिनंदन केले. 

error: Content is protected !!