पद्या पुन्हा जेरबंद ;हातकणंगले पोलिसांकडून शिताफीने अटक ..

हातकणंगले / प्रतिनिधी :
    जयसिंगपूर पोलीस ठाणेचे पोलीस वैद्यकीय तपासणी करिता घेऊन नेले असताना आरोपी प्रदीप उर्फ पद्या राजेंद्र कटकोळे (वय- २३ रा. हेरले , ता. हातकणंगले) यांने पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला होता . या घटनेने पोलीस दलासह सर्वत्र खळबळ उडाली होती. मात्र आज सकाळी हातकणंगले पोलिसांनी त्याला सापळा रचून शिताफिने पकडले.

    कोल्हापुर येथील गुन्हे शोध पथकाने संशयित आरोपी प्रदीप उर्फ पद्या याला कोल्हापुरात ताब्यात घेऊन चोरीच्या तपासाकरिता जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते . जयसिंगपूर पोलिसांनी पद्याला अटक करून जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करिता आणले होते. पण सोमवारी पद्याने पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केले होते. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली होती . अखेर हातकणंगले पोलिसांनी आज सकाळी हातकणंगले येथील वीज महामंडळाच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर त्याच्यावर झडप टाकुन त्याला पकडले. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड , डीवायएसपी रामेश्वर वैजने व पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल मच्छिंद्र पटेकर , महादेव खेडकर , राहुल धोत्रे , लखन सावंत व अतुल निकम यांनी केली आहे . संशयित पद्याला पुन्हा जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

error: Content is protected !!