जैन श्वेतांबर कोविड सेंटर आदर्शवत काम करेल – पालकमंत्री सतेज पाटील

पुलाची शिरोली / ता : २७

          हातकणंगले येथे सिमंधर जैन श्वेतांबर मंदिरात सर्व जैन संघटनाच्या वतीने सुरू केलेले कोविड केअर सेंटर इतर सर्व समाजासाठी आदर्श व्रत असून या सेंटरसाठी शासनाच्या वतीने संपूर्ण सहकार्य केले जाईल. या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आणि उपचार व्हावेत . असे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
         शिरोली येथील सिमंधर जैन श्वेतांबर मंदिरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जैन समाज संघटनांच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले.

शिरोली येथे सिमंधर जैन श्वेतांबर मंदिरामध्ये कोविड केअर सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राजूबाबा आवळे ‘, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शशीकांत खवरे व जैन ट्रस्टचे पदाधिकरी उपस्थितीत होते .

           यावेळी आमदार राजूबाबा आवळे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थितीत होते .जिल्ह्यातील जैन श्वेतांबर ट्रस्ट, मुनिसुव्रत स्वामी जैन श्वेतांबर ट्रस्ट, वासुपूजा स्वामी जैन श्वेतांबर ट्रस्ट, आणि सिमंतस्वामी जैन श्वेतांबर ट्रस्ट यांच्यावतीने हे कोविड केअर सेंटर या ट्रस्टचे वतीने सुरु करण्यात आले आहे.
           या ट्रस्टचे अध्यक्ष अनुक्रमे नरेंद्र ओसवाल, कांतीलाल संघवी, नितीन परमार, दिलीप ओसवाल आणि समन्वयक भरत ओसवाल यांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करून आणि जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. स्वच्छ बेड, प्रशस्त रूम, डॉक्टर, आरोग्यसेवक, औषधे आणि ऑक्सीजन सिलेंडर याची पुरेपूर सोय करून कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी संपूर्ण जैन समाजाने एकत्र येऊन साकार केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. इतर समाजानेही हा आदर्श घ्यावा . असे सांगून त्यांनी या सेंटरला राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन लागेल ती मदत करेल असे आश्वासन दिले.
        समन्वयक भरत ओसवाल यांनी नुकत्याच सुरू झालेल्या चातुर्मासाच्या काळात कोरोना रुग्णासाठी या केंद्रात आवश्यक ते सर्व आहार-विहार, उपचार केले जातील. रुग्णांची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल . असे सांगितले. हातकणंगलेचे तहसिलदार प्रदिप उबाळे, गटविकास आधिकारी अरुण जाधव , शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, जितूभाई गांधी, प्रकाश राठोड, वरुण जैन डॉ. प्रियदर्शनी जैन, महेश चव्हाण, व ग्रामविकास आधिकारी ए.एस. कटारे , सपोनि किरण भोसले यांचेसह जैन समाजातील मान्यवर तसेच डॉक्टर , आरोग्य सेवक उपस्थित होते.

error: Content is protected !!