पंडित काका

 काका, आपल्या जगण्यातून काय शिकावे।मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

या जगात येऊन ऐसे भव्यदिव्य करावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

किती दान केले न कधी आठवावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

आपणाबरोबर सर्व जनांस उद्धरावें
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

पैसा कमवता कमवता आयुष्यही जगावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

शेवटच्या क्षणापर्यंत हातीपायी नीट असावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

स्वविकास करता करता इतरांच्या प्रगतीस नावाजावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

‘पंडित’ नावांस शोभेल ऐसे पांडित्य कमवावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

कित्येकांनी शिष्य होण्यास धडपडावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

वैभव उभे करता करता देशकर्तव्यही आठवावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

ऐसा आशीर्वाद मागते, तुमच्यासारखे मला थोडेतरी जमावे।
मरावे परि किर्तीरुपे उरावे।।

error: Content is protected !!