एल्गार दुध आंदोलनाला पट्टणकोडोलीत शेतकऱ्यांचा पाठिंबा..

पट्टणकोडोली /ता: १

        पट्टणकोडोली (ता.हातकणंगले) येथे एल्गार आंदोलनाला सकाळी दुधाचे टँकर अडवून सुरुवात केली , शेतकऱ्यांनी ग्रामदेवतांना दुग्धाभिषेक घालून सरकारचा निषेध केला . तसेच गायीच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान तसेच दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान ५० रुपये अनुदान द्यावे. अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली .

           कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसायावर गंडांतर आले असताना . खासकरून ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या संसाराला आर्थिक गती देणेचे काम दुध व्यवसायाने केले आहे. अशा परिस्थितीत मात्र गेल्या काही दिवसापासून शासनाने दूधाचे दर कमी केले , असल्याने थोड्याफार प्रमाणात सुरू असलेले शेतकऱ्यांचे अर्थचक्र मंदावले आहे . शेतकरी अडचणीत सापडला आहे.
           दुध दर कपातीचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन केले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले यावेळी रयत क्रांतीचे कार्यकर्ते गुंडूराव मोरे, संतोष नेर्लेकर, सुमित पवार, यांच्यासह आणा विठ्ठाणा, कृष्णात नारूखान, शिवाजी ओमापुजारी, अक्षय मोरे, मंगा पुजारी,बिरदेव कुशाप्पा भारतीय जनता पक्ष,आर.पी.आय आठवले गट,गोपीचंद पडळकर समर्थक, छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  

error: Content is protected !!