आई-वडिलांना मनुष्याच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व – परमपूज्य चंद्रप्रभू सागर महाराज

कुंभोज येथे सिद्धी विधानचक्र कार्यक्रमाची सांगता

   कुंभोज ता. हातकलंगले येथे आचार्य श्री चंद्रप्रभू सागर व सरलसागर महाराजांच्या सानिध्यात श्री सिद्धिविधान चक्र कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यासन्मती सेवा संस्था कोल्हापूर संचलित स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या मार्फत दोन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवले बदल त्यांचा सत्कार करण्यात आला.  मालुताई पाटील(कुभोज) यांनी 49 वर्षे पाठशाला शिक्षका म्हणून काम केल्याबद्दल त्यांचा जैन समाजाच्या वतीने नागरि सत्कार करण्यात आला.

 यावेळी वीर सेवा दलाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्राध्यापक सुनील खोत, पत्रकार संजय खुळ,राजू होस्कुले, महावीर पाटील, कुंभोज मधील जैन मंदिराचे सर्व संचालक तरुण कार्यकर्ते श्रावक  श्राविका उपस्थित होते.

 यावेळी परमपूज्य चंद्रप्रभू सागर यांचे मंगल प्रवचन झाले. त्यांनी आई-वडिलांना मनुष्य जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असून जगामध्ये सर्वांचे दरवाजे बंद होईल पण सर्व मुलांच्यासाठी आई-वडिलांचे दरवाजे कायम उघडे असतात, त्यासाठी आई-वडिलांच्या भावनांची कदर करा. ज्या आई-वडिलांनी लहान असताना आपल्याला हाताला धरून चालायला शिकवले त्यांना उत्तारत्या वयात हाताचा आधार घ्या असा मौलिक सल्ला दिला.
 यावेळी नऊ दिवसांमध्ये विविध प्रकारचे सहकार्य करणाऱ्या सर्व जैन स्त्रावकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब चौगुले,सन्मती चौगुले ,शरद कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले ,माजी सरपंच प्रकाश पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे माजी चेअरमन अनिल भोकरे, तसेच वीर सेवा दल,वीर महिला मंडळ जैन समाजातील श्रावक श्राविका उपस्थित होत्या. सायंकाळी भव्य मिरवणुक व रर्थोत्सवाने सदर कार्यक्रमाची सांगता झाली.
error: Content is protected !!