नवे पारगाव / ताः ३ संदीप सोने

हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव ग्रामपंचायतीस आय.एस.ओ. (ISO) ९००१:२०१५ आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट मानांकन पुरस्कार मिळाला असल्याचे प्रथम लोकनियुक्त सरपंच प्रकाश देशमुख यांनी सांगितले . मानांकनामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद पातळीवर या ग्रामपंचायतीच्या नावलौकिकामध्ये आणखीन भर पडली असुन पुरस्कारामुळे ग्रामपंचायतीचे सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वारणा परीसरातील ग्रामस्तरावरती ग्रामपंचायत पातळीवरील आय. एस. ओ. मानांकन मिळविणारी ही पहिलीच ग्रामपंचायत आहे .
मानांकनासाठी नवे पारगावच्या ग्रामपंचायतीचे सुसज्ज कार्यालय, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज,ग्रामपंचायतीकडील कर वसुली व्यवस्थापन, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा,ई-प्रणाली-एस.एम.एस सिस्टमद्वारे लोकांना माहिती पुरवण्याची सुविधा, डिजीटलाईजेशन, सीसीटीव्ही, ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात व पाठपुरावा करण्यात आलेली विविध गुणवत्तापुर्ण विकासकामे,दैनंदिन पाणी पुरवठा,जल शुद्धीकरण (आर.ओ प्रणाली) प्रकल्प, वॉटर टँकर सुविधा, स्वच्छता व प्लॅस्टिक निर्मुलन, दैनंदिन कचरा व्यवस्थापन,कचरा घंटागाडीसाठी ट्रॅक्टर ट्रॉली सुविधा,निर्मलग्राम,गावच्या स्मशानभूमी-कब्रस्थान मधील विकासकामे,स्ट्रीटलाईट व वर्दळीच्या ठिकाणी हायमास्ट लाईटची सुविधा, बालोद्यान, क्रीडांगण व ओपन जीम सुविधा,आठवडी बाजार व्यवस्थापन,ग्रामदैवत यात्रा व्यवस्थापन, वृक्षारोपण, सामजिक व आरोग्यविषयक शैक्षणिक उपक्रम इत्यादी सर्व निकषांचे प्रत्यक्ष उल्लेखनीय मुल्यमापनावरूनच हे मानांकन ग्रामपंचायतीस प्राप्त झालेचे सरपंच प्रकाश देशमुख यानी सांगितले.
या मुल्यांकन प्राप्तीसाठी वारणा दुध संघाचे संचालक व पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप देशमुख, जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई आळतेकर, माजी उपसभापती श्रीमती सुलोचना देशमुख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. उपसरपंच शुभदा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविकास अधिकारी अंकुश गोरे,क्लार्क संजय कांबळे,कुसुम पेटकर व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.या आयएसओ मानांकन उद् घोषणा प्रसंगी माजी सरपंच नामदेवराव नेर्लेकर, बाळासाहेब बंडगर,बाळासाहेब बोणे,एप्रोज शिगावे,तंटामुक्तीचे अध्यक्ष महेश नेर्लेकर, डाॅ.शरफुद्दिन पिरजादे, पांडुरंग सिद यांचेसह सर्व ग्रा. पं. सदस्य,आरोग्य सेविका माधवी हजारे,सर्व अंगणवाडी-आशा सेविका,कर्मचारी व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
