पाटण / ताः ८ प्रतिनिधी
पाटण तालुक्यात शुक्रवारी रात्री आलेल्या अहवालात आणखी सात व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. खांडेकरवाडी ( सोनवडे ) येथील एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर आज शनिवारी आणखी चार व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 331 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली . त्यापैकी तब्बल 230 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे . तर आत्तापर्यंत यात 19 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या 82 बाधीतांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पाटील यांनी दिली.
शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात तालुक्यातील पापर्डे येथील पुरूष, सणबूर येथील महिला, पाटण येथील पुरूष, वजरोशी येथील पुरूष, कुठरे येथील महिला, मारूल हवेली येथील पुरूष यांचा समावेश आहे. या बाधीत रूग्णांना तातडीने पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्या संपर्कातील कुटुंबीय, नातेवाईक आदिंना हाय रिस्कमधील व्यक्तींना इन्स्टीट्युशल व काहींना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. शनिवारी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये नेरळे येथील 58 वर्षे पुरूष 30 वर्षे महिला , जाधववाडी 61 वर्षे महिला, मल्हारपेठ 28 वर्षे पुरूष यांचा समावेश असून त्यांना घरी सोडून आगामी सात दिवसांसाठी होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. शुक्रवारी खांडेकरवाडी येथील एका पुरुषाचा कृष्णा हाॅस्पीटल कराड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला . त्यांचेवर स्थानिक नगरपालिकेकडून कोवीड निकषांनूसार अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
पाटण शहरात 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
दरम्यान पाटण शहरात झपाट्याने कोरोना रूग्नांची संख्या वाढतच चालली आहे. आतापर्यंत शहरातील 19 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली त्यापैकी दोघांचा मृत्यू व दोघांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित 15 बाधीतांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी चव्हाण गल्ली, कवडेगल्ली, ब्राम्हणपुरी, रामापूर येथील प्रत्येकी एक अशा चौघांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला. शहरातील खाजगी डाॅक्टर, त्यांचा मुलगा, एक ग्रामसेवक, औषध विक्रेता व त्यांच्यातील कामगार आदींचाही यात समावेश आहे.
पाटण शहरातील पाच जन कोरोना बाधीत सापडल्याने कवडेगल्ली ,ब्राम्हणपुरी , चव्हाणगल्ली ,रामापुर येथील काही भाग दक्षता म्हणुन नगरपंचायतीच्या वतीने सील करण्यात आला आहे . दरम्यान राष्ट्रवादीचे नेते सत्यजीतसिंह पाटणकर यांनी पाटण शहरात अनेक ठिकाणी भेटी देवुन पहाणी केली आहे .
