पाटण / ताः ७ ( विक्रांत कांबळे )
पाटण तालुक्यात आणखी सात व्यक्तींचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला. दरम्यानच्या काळात खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेले दोन कोरोना रूग्ण अशी एकूण नऊ बाधीतांची संख्या वाढली आहे. यात पाटण शहरातील एका खासगी डाॅक्टरचा समावेश आहे. शुक्रवारी नव्याने 11 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आता तालुक्यातील एकूण बाधीतांची संख्या 324 झाली असून यापैकी तब्बल 221 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे . तर आत्तापर्यंत 18 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या 85 बाधीतांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पाटील यांनी दिली.
गुरूवारी आलेल्या अहवालात पाटण येथील 23 वर्षे पुरूष, पापर्डे 70 वर्षे पुरूष, 62 व 26 वर्षे महिला, नाडे 70 व 74 वर्षे महिला, चाफळ येथील 36 वर्षे पुरूष अशा सात व्यक्तींचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यानच्या काळात खाजगी ठिकाणी चाचण्या घेऊन पाॅझिटीव्ह आलेले व सध्या उपचार घेत असलेल्या पाटण येथील 55 वर्षे पुरूष, खांडेकरवाडी येथील पुरूष या दोघांसह आता एकूण बाधीतांची संख्या 324 इतकी झाली आहे. या बाधीतांवर कोरोना केअर सेंटर पाटण, कृष्णा, सह्याद्री हाॅस्पीटल कराड, सिव्हिल हाॅस्पीटल सातारा व काही खाजगी रूग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत. या बाधीतांच्या संपर्कातील कुटुंबीय व नातेवाईक आदी हायरिस्कमधील व्यक्तींना पाटण येथील प्रियदर्शनी महिला वसतीगृह, मिल्ट्री बाॅइज होस्टेल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जुने वसतीगृह व तळमावले येथील कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी म्हावशी येथील 40 व 26 वर्षे महिला, 4 वर्षे बालिका, आंब्रग येथील 25, 58, 29 वर्षे पुरूष, 50, 25 वर्षे महिला, तारळे 5 वर्षे बालक, नेरळे 63 वर्षे पुरुष, मोरगिरी 70 वर्षे महिला या 11 व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडून आगामी सात दिवसांसाठी होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.दरम्यान पाटण शहरात आत्तापर्यंत एकूण 14 व्यक्तींना कोरोनाची लागन झाली आहे.
यापैकी दोघांचा मृत्यू व दोघांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 10 बाधीतांवर विविध रूग्नालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान चार दिवसांपुर्वी शहरातील एका खाजगी डाॅक्टरनी आपली कोरोना चाचणी खाजगी लॅबमध्ये केल्यानंतर त्यांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला. त्यानंतर त्यांचेवर कराड येथेच एका रूग्णालयात पुढील उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.