पाटण / ता : ९- विक्रांत काबंळे
पाटण शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आता कठोर उपाययोजना करणे गरजैचे असुन त्यासाठी महसुल विभाग ,पाटण नगरपंचायत व आरोग्य विभागाने एकत्रीत चर्चा केली पाहीजे . त्याच बरोबर आता स्वत: नागरिकांनीही गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे . तरच पाटण शहरातील घुसलेला कोराना हद्दपार होईल . अन्यथा पाटणची धारावि होईल .
दिवसेंदिवस पाटण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रोज नवनवीन गावात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळुन येत आहेत. पाटण तालुका कोरोनाचा ‘हॉट स्पॉट’ बनला आहे. पाटण शहराची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये . यासाठी खबरदारी म्हणून आता कठोर उपाययोजना कराव्या लागतील नाही . तर यापेक्षाही भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. येथून पुढे नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारावाई करावी . कारण अशा लोकांमुळे आज हजारो लोकांचा जीव धोक्यात येत आहे .
पाटण शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी-आशा सेविका, पोलीस कर्मचारी आणि इतर शासकीय अधिकारी हे सर्वजण अहोरात्र काम करत आहेत. आता त्यांना आपल्या साथीची गरज आहे. पहिल्या टप्प्यात आपण त्यांना चांगली साथ दिली त्यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात होता. परंतु दुर्दैवाने दुसऱ्या टप्प्यात लोकांचे गांभीर्य कमी झाले, त्याचाच परिणाम म्हणून आता रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता नागरिकांनी परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच सावध होऊन कोरोना संसर्ग टाळण्यासाठी. सर्वांनी घराबाहेर जाताना मास्क,सॅनीटायझर वापरावे. काही लोक सरकारने दिलेल्या सूचना पाळत नाहीत . पाटण शहरात लोक रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात . शासनाच्या व नगरपंचायतीच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचे काम होत आहे . तसेच दुकाने, भाजी मंडई यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी टाळून सोशल डिस्टनसिंग ठेवणे गरजेचे आहे . सोशलडीस्टन्स न ठेवणाऱ्या दुकानावरही कारवाई करणे गरजेचे आहे .

पाटण नगरपंचायत स्वतंत्र असली तरी येथे आरोग्य यंत्रना वेगळी नाही पाटण शहराच्या लोकसंख्येचा विचार करता येथे असणारा अपुरी कर्मचारी संख्या , स्वतत्रं नसलेली रूग्णवाहीकेची सोय यामुळे पाटण शहरातील पाँझीटीव्ह रुग्ण आढळुन आल्यावर पाटण तालुका आरोग्य विभाग सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे . तर काही वेळा चालढकल पणा करत असल्याचे दिसते . या रूग्णाना वेळेत रूग्णवाहीका मिळत नसल्याचे दिसुन येते . तासन् तास रुग्णाना रूग्णवाहीकेची वाट पहात ताटकळत बसावे लागल्याच्या घटना येथे घडल्या आहेत . आरोग्य विभागाने शहरी व ग्रामीण असा दुजाभाव न करता आरोग्य विभागाने पाटण शहरात आढळुण येणाऱ्या रूग्णांना तातडीने सेवा कशी मिळेल . याकडे लक्ष देणे गरजेचे आहे . महसुल यंत्रनेने तशा सुचना आरोग्य विभागाला देणे गरजेचे आहे
जिल्हाधीकाऱ्यांनी महसुल .नगरपंचायत व आरोग्य विभाग यांची पाटण शहराची तातडीने स्वतंत्र बैठक घेवुन पाटण शहरात कोरोनाचा झालेला शिरकाव रोखण्यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील याचा आढावा घ्यावा . पाटण नगरपंचायतीला स्वतंत्र रुग्णवाहिका द्यावी . वेळ प्रसंगी संचार बंदी व लाँकडाऊन घेण्याचा निर्णय घेतला पाहिजे . तरच पाटण शहर कोरोना मुक्त होईल .
शासनाने आरोग्य विभागाकडे जबाबदारी दिली असतांना सुद्धा कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे ट्रेसिंग करतांना आरोग्य विभागाचा एकही प्रतिनिधी उपस्थित राहत नसल्यामुळे फक्त नगर पंचायतीचे कर्मचारी ट्रेसिंगचे काम करताना दिसत आहेत. सदर बाब अत्यंत गंभीर असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे पाटण तालुक्यातील आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम पाटण शहरातील डॉक्टर व औषध विक्रेते अविरतपणे करत असूनसुद्धा पाटण शहरावर आरोग्य यंत्रणेचे होणारे दुर्लक्ष काळजी वाढविणारे आहे.
—अनिल भोसले माजी ग्रामपंचायत सदस्य .पाटण