वार्षिक सभेपूर्वीच लाभांश वाटप करण्याची परवानगी मिळावी ; राष्ट्रवादी सहकार सेलचे अध्यक्ष शिरीष देसाई यांची मागणी

पट्टणकोडोली / ता.३०: संतोष मोहिते

          लॉकडाऊनमुळे सहकारी संस्थांना सभा घेता येत नाहीत.त्यामुळे संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वीच लाभांश वाटप करण्याची परवानगी मिळावी . यासाठी राष्ट्रवादी जिल्हा सहकार सेलचे अध्यक्ष शिरीष देसाई यांनी जिल्हा उपनिबंधकांना निवेदन दिले. सध्या देशात कोरोना ह्या आजाराने हाहाकार माजला आहे.त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे असह्य झाले आहे.सर्वत्र सणासुदीचे दिवस असताना . ते साजरे करण्यासाठी लोकांच्याकडे पैसे नाहीत . अशी वाईट अवस्था झाली आहे. येणाऱ्या गणपती, दसरा, व दिवाळी ह्या सणासाठी तरी लोकांच्या कडे पैसे यावेत . म्हणून सहकार संस्थेमधील जनरल सभेच्या पूर्वी संस्थेच्या वार्षिक नफ्यातून त्यांना लाभांश वाटप करण्याची परवानगी मिळावी . 

        म्हणून कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय पाटील व कार्याध्यक्ष अनिल साळुंखे यांच्या सल्ल्यानुसार कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष शिरीष देसाई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांना निवेदन देण्यात आले.या महामारीच्या काळामध्ये सभासदांना थोडासा दिलासा मिळेल . या भावनेतून सभासदांचा असणारा नफा त्यांना योग्य वेळी जर मिळाला तर तो अधिक लाभदायी ठरेल म्हणून सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्याच्या अटीवर नफा वाटपास परवानगी दिली पाहिजे.अशी सर्व जनतेची सुद्धा अपेक्षा आहे.निवेदन देतेवेळी दत्तात्रय कोळी,दादासो सुर्यवंशी, संतोष सुर्यवंशी व तात्यासो पाटील उपस्थित होते.        

error: Content is protected !!