कोरोना पाँझीटिव्हची संख्या पाच ; ग्रामपंचायतीकडुन दुर्लक्ष

पट्टणकोडोली / ता :२५ संतोष मोहिते

               हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली मधील त्या कोरोना बाधित वृध्दाच्या पत्नीचा व सूनेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला अाहे.त्याचबरोबर माहेरी गेलेली महिला व परप्रांतांतून परत आलेला कामगार पाँझीटिव्ह आल्याने गावातील कोरोना पाँझीटिव्हची संख्या पाच झाली आहे. दरम्यान,कोरोनाचा पेशंट सापडलेल्या भागात ग्रामपंचायतीने अौषध फवारणी केली नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनास चांगलेच धारेवर धरले.
                येथील शाहु नगरमधील एका ८१ वर्षीय वृध्दाला कोरोनाची लागण झाल्याने गावात कोरोनाची एन्ट्री झाली.त्यांची पत्नी,मुलगा,सून,नातू व घरकाम करणारी महिला यांचा स्वँब तपासणीस घेतला होता.यातील वृध्दाची पत्नी व सून या दोघींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर वृध्दावर उपचार करणार्‍या खाजगी डॉक्टरसहित इतर पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.काही दिवसापुर्वी दुसर्‍या तालुक्यातील माहेरी गेलेली एक महिला व परप्रांतांतून परत अालेल्या कामगारास हि कोरोनाची लागण झाली आहे.मात्र या दोघांचा ही गावात संपर्क झाला नव्हता.
              दरम्य‍ान,वृध्दास कोरोनाची लागण होताच ग्रामपंचायतीने शाहू नगर परिसर सील केला.मात्र या भागात ग्रामपंचायत प्रशासनाकडून औषध फवारणी व परिसरातील वृध्दांना प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप केले , नसल्याच्या कारणांवरुन या परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामसेवक सिदनाळे यांना चांगलेच धारेवर धरले.यावेळी कोरोना सहनियंत्रण समितीने मध्यस्थी करत औषध फवारणी व वाटप तात्काळ करण्य‍ाचे आश्वासन देवून यावर पडदा पाडला.यावेळी पंचायत समिती सदस्य अरुण माळी, पोलीस पाटील मोहन वर्धन,कोरोना सहनियंत्रण समितीचे सदस्य प्रकाश जाधव,शरद पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.   

error: Content is protected !!