दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला ठार

कोल्हापूर/प्रतिनिधी
सोनतळीजवळ दुचाकीने जोरदार धडक दिल्याने एक महिला ठार झाली तर दुसरी जखमी झाली . मंगळवारी रात्री आठ वाजता हा अपघात झाला . मालती अशोक माने ( वय ५१ रा . सोनतळी ) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे तर शारदा माने असे जखमी महिलेचे नाव आहे.


याबाबत माहिती अशी , मालती माने व शारदा माने या सोनतळी येथील एका हॉटेलमध्ये काम करतात . मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्या हॉटेलमध्ये कामासाठी पायी निघाल्या होत्या . दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने दोघींना जोरदार धडक दिली . यामुळे त्या दोघीही जखमी झाल्या . नातेवाईकांना ही माहिती मिळताच दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले . पण मालती माने यांचा मृत्यू झाला तर शारदा माने यांच्यावर उपचार सुरु आहेत . मालती माने यांच्या पश्चात पती व दोन मुले आहेत . करवीर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून दुचाकीस्वारावर गुन्हा नोंद झाला आहे .

error: Content is protected !!