पेट्रोल , डिझेल दरवाढ विरोधात कॉग्रेसचे निवेदन

इंधन दरवाढीच्या विरोधात निवेदन देताना आमदार राजू बाबा आवळे व अन्य पदाधिकारी

हातकणंगले /ताः ७

       तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल व डिझेल च्या वाढत्या दराबाबत आम . राजूबाबा आवळे यांचे हस्ते तहसिलदार प्रदीप उबाळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे केंद्र व राज्य सरकारला विनंती करण्यात आली आहे . दररोज होणाऱ्या इंधनवाढीमध्ये कपात केल्यास दर कमी होण्यास व महागाईवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार असून सर्वसामान्य जनतेला फायदा होवुन जनतेला दिलासा मिळेल. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष भगवान जाधव, बबनराव पाटील, बाळगोंडा पाटील, शकील आत्तार, पोपटराव इंगवले, डॉ विजय गोरड, सुनील भोसले, पिंटू किनिंगे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!