कोल्हापूर /ता .१८ प्रतिनिधी
नागरिकांनी गुगल पे अथवा फोन पे द्वारे व्यवहार पूर्ण न झाल्यास कस्टमर केअरचा नंबर शोधून त्यावरून व्यवहार केले आहेत . यातील बऱ्याच नागरिकांची ऑनलाईन फसवणूक होऊन त्यांच्या बँक खात्यातील रक्कम काढून घेऊन फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार निदर्शनास आले आहेत. सध्या हा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. अशा प्रकारच्या काही तक्रारी सायबर पोलीस ठाणे कोल्हापूर येथे प्राप्त झाल्या आहेत . तरी नागरिकांनी फसवणूक होवु नये. याकरिता सतर्क राहुन व्यवहार करावेत . व स्वःताची फसवणुक होवु नये याची दक्षता घेण्याचे आवाहन कोल्हापूर सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे .