हातकणंगले पोलिसांची मटक्या-गुटख्यावर कारवाई

हातकणंगले /ता : ११

माणगाव (ता.हातकणंगले) येथील माळभाग जुगार अड्डयावर कल्याण मटका घेताना कारवाई करण्यात आली . कारवाईत मटक्याच्या साहित्यासह १०८०५ / – रू .चा मुद्देमाल जप्त करण्यात आला . बुकीमालक मालक संदीप जगदाळे (रा . इचलकरंजी ) दिलीप आण्णा कोळी ( वय. ५३ वर्ष . रा . माणगाव ) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे . तसेच कुंभोज येथील अवैद्य गुटखा विकत असताना रवींद्र नाना रतूनकर (वय- ३५ वर्ष रा . बाहुबली रोड , कुंभोज ) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून १७३०/- रु .चा गुटख्याच्या साहित्यासह मुद्देमाल जप्त केला आहे . ही कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा व एलसीबीचे पो .नि. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली . कारवाई नरसिंह कांबळे, शिवाजी पडवळ, प्रल्हाद देसाई, अमर शिरढोने, रणजीत पाटील, पांडुरंग पाटील, दिग्विजय देसाई , राकेश इंदुलकर ,संदीप कांबळे ,दिलावरसिंग पाडवी यांनी केली आहे पुढील तपास भीमराव धोत्रे करीत आहेत .

error: Content is protected !!