खाऊ गल्लीतील व्यावसायिकांवर पोलिसांची धडक कारवाई

इचलकरंजी / प्रतिनिधी

    इचलकरंजी शहरातील सुंदर बागे जवळील खाऊ गल्लीतील आडतीस व्यावसायिकांवर पोलिसांनी धडक कारवाई करून जमावबंदीचा आदेश भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. शहरातील खाऊ गल्लीतील ३८ व्यावसायिकांवर गावभाग पोलिसांनी पाचशे रुपये दंडाची पावती केली. ही कारवाई गावभाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या पथकाने केली.
    शहरातील नागरिक व्यावसायिक यांनी शासनाने दिलेले नियम पाळावेत अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ या जबाबदारीने प्रत्येक नागरिकांनी वागले पाहिजे. व आपल्या शहर कोरोना मुक्त करायचे असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सांगितले.

error: Content is protected !!