पोलिसासह डॉक्टर पॉझिटिव्ह : शहरातील संख्या सत्तावीस

जयसिंगपूर / ताः२५

           जयसिंगपूरमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या कोरोनो चाचणी सेंटर मध्ये पहिल्याच दिवशी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणाऱ्या पण कोल्हापूरात वास्तव्यास असणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्यांचासह शहरातील आणखी एक डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले आहेत. डॉक्टर सांगली येथील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत.
         जयसिंगपूर पोलिस ठाणेतील कर्मचारी दोन दिवसांपूर्वी नाईट डय़ुटी नंतर एक दिवसांची साप्ताहिक सुट्टी घेऊन सकाळी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले होते .दरम्यान त्या पोलिस कर्मचाऱ्यास साधारण त्रास होत असल्याने जयसिंगपूर येथे नव्याने सुरू झालेल्या कोविड तपासणी केंद्रात स्लॅब तपासणी दिला होता. दुपारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले. तसेच गल्ली क्रमांक तीनमध्ये वास्तव्यास असणारे व बाहेर गावात नोकरीवर असणाऱ्या एका डॉक्टरांचा अहवालही पॉझिटिव्ह आला असून सदर डॉक्टर सांगलीतील एका रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून उपचार घेत आहेत. यामुळे शुक्रवारी दिवसभरात शहरांमध्ये दोन रुग्ण वाढले असून आता पर्यंत शहरात २७ रुग्ण झाले आहेत.
            शुक्रवारी सायंकाळी पोलिस स्टेशन व परिसरात सॅनिटायझरची औषध फवारणी करण्यात आली आहे. तर गल्ली क्रमांक तीन येथील परिसर प्रतिबंध क्षेत्र म्हणून जाहीर करून त्या परिसरात सॅनिटायझर औषध फवारणी करण्यात आली आहे. तात्काळ नगराध्यक्ष डॉ . निता माने , प्रभागाचे नगरसेवक राहुल बंडगर व पालिका आरोग्य अधिकारी , कर्मचारी , प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी पहाणी केली.

error: Content is protected !!