हेरले/ ताः ३ प्रतिनिधी

पोलिस व पत्रकार हे दोन्हीही लोकशाहीतील अतिशय महत्वाचे जबाबदार घटक आहेत. दोघांनीही एकसंघ राहुन पारदर्शकपणे काम केलेस लोकशाही अधिक बळकट होऊन सामान्य जनतेला योग्य न्याय मिळेल . असे मत प्रशि. पोलिस उपअधिक्षक प्रणिल लता प्रफुल्ल गिल्डा यांनी व्यक्त केले.
प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधिक्षक म्हणून त्यांनी हातकणंगले पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार स्विकारला . यानिमित्त कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, पोलिस दलात येऊन सर्वसामान्यांची सेवा करणे आणि गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करणे हे आपले ध्येय आहे. यासाठी सर्वसामान्य जनतेशी संपर्क कायम ठेवण्यावर आपला भर राहील. चांगल्या गोष्टींचे आपण निश्चितच समर्थन करू मात्र अवैध धंद्याना आजिबात थारा दिला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. जिल्हा पोलिस प्रमुख अभिनव देशमुख यांनी पोलिस दलांत शिस्त आणि व्यवस्था निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे तशीच शिस्त आपण सदैवपणे राबविली जाईल .
यावेळी संघटनेच्या वतीने स्मरणिका व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, कौन्सिल मेंबर अतुल मंडपे, खजानिस सदानंद कुलकर्णी, सुरेश कांबरे, बाबूराव जाधव, आनंदा काशिद, सूरज पाटील, प्रशांत तोडकर, अवधूत मुसळे तोफिक मुजावर, रोहन साजणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.