प्रशासक पदावर पोलीस पाटील यांना संधी द्यावी ;संघटनेची मागणी

हातकणंगले /ताः १६

              मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीत प्रशासक म्हणून पोलीस पाटील यांची प्राधान्याने नियुक्ती करावी . अशी मागणी हातकणंगले तालुका पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हातकणंगले पंचायत समिती गटविकास अधिकारी अरूण जाधव व आ. राजु बाबा आवळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
              हातकणंगले तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रियाज मुजावर , राहुल वाघमोडे, अकबर पठाण [सचीव ], पंढरीनाथ गायकवाड [कार्याध्यक्ष ], मारुती हेगडे [ उपाध्यक्ष ], नितीश तराळ यांच्यासह अन्य पदाधिकारी हजर होते .

आम. राजुबाबा आवळे यांना प्रशासक पदावर पोलीस पाटलांना संधी देण्याच्या मागणीचे निवेदन देताना पोलीस पाटील संघटना.

                  कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील यांनी चोख जबाबदारी स्वीकारली असून, सर्वजण उच्च शिक्षित आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाचा चांगला अनुभव सर्वांनाच असल्याने संकट काळात आम्ही ग्रामपंचायतीचा उत्तम कारभार करण्यास समर्थ असल्याचे संघटनेतर्फे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा कारभार करण्यासाठी शासनातर्फे प्रशासक नियुक्त करण्यात येणार असल्याने पोलीस पाटील याना संधी देण्याची शिफारस करावी .अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
                  कोरोना महामारी संक्रमित काळामध्ये महाराष्ट्रात ग्रामपातळीवर समाजात प्रत्यक्ष काम करणारा प्रशासन व जनतेचा दूवा म्हणजे पोलीस पाटील पद आहे .पोलीस पाटील ग्राम पातळीवर एक उत्तम प्रशासकीय प्रशासक म्हणून कर्तव्य पार पाडू शकतात,तर मग अशा पोलीस पाटील घटकाला ग्रामपातळीवर ग्रामव्यवस्थेचा प्रशासक म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने आणीबाणी काळासाठी नेमणूक करावयास पाहीजे.

सदर प्रशासकीय पदास म्हणजे लोकशाही मधील सरपंच या पदाचे महत्त्व कायम राहून प्रशासन व जनतेचा राजकारण विरहीत काम करणारा खऱ्या अर्थाने प्रशासक म्हणून पोलीस पाटील आपली भूमिका पार पाडू शकतील.

error: Content is protected !!