भाऊसो पाटील यांचे मरणोत्तर देहदान

इचलकरंजी येथील गावभागातील भाऊसो कलगोंडा पाटील (वय 74) यांच्या इच्छेनुसार मृत्यूपश्‍चात देहदान करण्यात आले. भाऊसो पाटील यांचे 1 मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार नातेवाइकांनी त्यांचा मृतदेह डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाकडे सुपूर्द केला.

भाऊसो पाटील हे कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी अमर पाटील यांचे वडील आणि वीरशैव उत्कर्ष मंडळाचे सेक्रेटरी किशोर पाटील यांचे काका होतं. गावभागातील महादेव मंदिर परिसरातील पाटील गल्लीत ते वास्तव्यास होते. मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वपरिचित होते. त्यांना वंडे पाटील म्हणून ओळखले जात. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मृत शरीराची आवश्यकता पडते. एखाद्या व्यक्तीने देहदान केल्यास त्या शरीरावर अभ्यास करता येतो. पण, देहदानाची संख्या एवढ्यात रोडावली आहे. असे असले तरी इचलकरंजीतील एका व्यक्तीने देहदानाचा संकल्प केला. वयाच्या 74 व्या वर्षी मृत्यू झाल्यानंतर त्यांचे शरीर मेडिकल कॉलेजला देण्यात आले. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी हा निर्णय घेतला. भाऊसो पाटील यांनी मृत्यूच्या दोन वर्षांपूर्वीच मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला होता. मृत्यूनंतर आपले शरीर  मेडिकल  रुग्णालयाला  देण्यात यावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी मृतदेह डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजला दिला आहे.

error: Content is protected !!