वाढदिवसानिमित्त मूर्तिकार, कारागिराना फळे वाटप ; प्रहार चित्रपट संघटनेतर्फे सत्कार

हेरले /ता: १३-प्रतिनिधी

          अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त कावळा नाका ते शिरोली परिसरातील मूर्तिकार, कारागीर उद्योजकांना फळे वाटप करण्यात आले . ऐन पावसाळ्यात व कोरोनाच्या संकटकाळात छोटे उद्योजक व कारागीर यांची भेट घेऊन संदीप मोहिते -पाटील यांनी वाढदिवसानिमित्त फळे वाटप करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
         शिरोली येथे राज्यमंत्री नाम. बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार चित्रपट संघटनेचे राज्याध्यक्ष, चित्रपट निर्माते ,लेखक संदीप मोहिते – पाटील यांचा वाढदिवसानिमित्त चित्रपट नाट्य कलाकार दगडू माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
       यावेळी प्रहार चित्रपट संघटनेचे कोल्हापूर जिल्हा संघटक दगडू माने, सिने-नाट्य कलाकार राजेंद्र प्रधान, कलाकार डी वाय माळी , नीरज कलावंत, सागर डपाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुर्तिकार कारागीरांना फळे वाटप करतांना संदीप मोहिते ,दगडू माने व अन्य मान्यवर.

error: Content is protected !!