आम. प्रकाश आवाडे यांना मातृशोक

इचलकरंजी / ता :25

             माजी खास . कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या सुविद्य पत्नी सौ इंदुमती आवाडे (वय -86 वर्ष ) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले . माजी मंत्री व विद्यमान आम . प्रकाश आवाडे यांच्या त्या मातोश्री होत . लहानापासून -थोरापर्यंत त्यांना सर्वजण ‘आऊ’ या आदरार्थी नात्याने बोलवत असत . आवाडे घराण्यातील राजकीय वाटचालीमध्ये त्यांचा गेल्या सहा दशकांपासून यशस्वी सहभाग होता . त्याच्या जाण्याने राजकीय ,सामाजिक शैक्षणिक व सहकार क्षेत्रासह महिला वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे .इंदिरा महिला सहकारी सूत गिरणीच्या त्या संस्थापक अध्यक्षा होत्या . सूतगिरणीच्या उद्घघाटनप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते . गेल्या 60 ते 65 वर्षापासून आवाडे घराण्यात येणाऱ्या प्रत्येक लहान -मोठ्या कार्यकर्त्याची विचारपूस करून आधार देण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे . त्यांच्या पश्चात मुलगा उत्तम आवाडे ,किशोरी आवाडे व सपना आवाडे , नातू राहुल स्वप्निल सह मुली ,नात , नातवंडे व नातसून परतवंडे व तमाम आवाडे गटाचे कार्यकर्ते असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली .

error: Content is protected !!