प्रकाश हाॅस्पिटल कोरोना रूग्णासाठी लढेल – डाॅ . अभिजीत चौधरी

इस्लामपूर/ता : ५- जितेंद्र पाटील

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व भविष्यातील काही दिवस लक्षात घेता शासकीय हाॅस्पिटलसह खाजगी दर्जेदार हाॅस्पिटलमध्ये ही कोरोना रूग्णावर उपचाराची सुविधा सुरु करणे आवश्यक आहे . प्रकाश हाॅस्पिटल मध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध असुन हाॅस्पिटलमधील सर्व वैद्यकीय स्टाफ कोरोना लढाईत मोठ्या धैर्याने कर्तव्य म्हणुन लढेल . असे मत सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ.अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केले.
उरूण इस्लामपुर शहरातील प्रकाश हाॅस्पिटल मध्ये सुरु होणार्‍या कोरोना रुग्ण तपासणी व उपचार विभागाची पहाणी जिल्हाधिकारी डाॅ.अभिजीत चौधरी यांनी केली . यावेळी प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मधील वैद्यकीय,नर्सिग व नाॅनटिचींग स्टाफशी त्यांनी संवाद साधला.यावेळी प्रकाश हाॅस्पिटलचे संस्थापक,उरुण इस्लामपुर नगरपरीषदेचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डाॅ.अभिजीत चौधरी म्हणाले, शासकीय हाॅस्पिटल बरोबर निवडक खाजगी हाॅस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची तपासणी व उपचाराची सुविधाची गरज ओळखुन आपल्या हाॅस्पिटल मध्ये कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.शासन व प्रशासनस्तरावर सर्व ते सहकार्य करण्यात येणार आहे . देशावर आलेल्या संकट काळात आपण सर्वांनी मनात कोणतीही भिती न बाळगता रुग्णांची सेवा करावी . सेवा करत असताना सर्व काळजी घ्या.हाॅस्पिटलमधील सेवा सुविधा चांगल्या आहेत . आता तुमची सर्वाची जबाबदारी आहे . येणार्‍या रुग्णांस जास्तीत जास्त चांगली सेवा देऊन त्याला बरे करणे . व त्याच्या कुटुंबाला आधार देणं . हे काम तुमच्या सर्वाकडुन निश्चित होईल . तुमची सर्व टीम तरुण,अनुभवी व चांगली आहे.सांगली जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात तुमच्या व्यवस्थापनास यश येईल.
यावेळी प्रकाश हाॅस्पिटलचे प्रशासन विभागाचे प्रमुख डाॅ.अभिमन्यु पाटील यांनी हाॅस्पिटलमधील सेवा सुविधेबाबत,स्टाफबाबत व कोरोना रूग्ण तपासणी,औषध उपचाराच्या नियोजनाबाबत माहीती दिली.यावेळी प्रांताधिकारी नागेश पाटील,तहसिलदार रविंद्र सबनीस,उरूण- इस्लामपुर नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार,उपमुख्याधिकारी प्रमिला माने,गटविकास अधिकारी शशीकांत शिंदे,प्रकाश हाॅस्पिटल चे अध्यक्ष संजय जाधव,भाजपाचे वाळवा ग्रामीण मंडल अध्यक्ष प्रसाद पाटील, भाजपाचे जेष्ठ नेते मधुकर हुबाले, धैर्यशील मोरे,संदीप सांवत,यदुराज थोरात आदिसह अन्य मान्यवर वैद्यकीय तज्ञ,नर्सिंग स्टाफ उपस्थित होता,आभार विश्वजीत गिरीगोसावी यांनी मानले.

प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मधील वैद्यकीय,नर्सिग व नाॅन टिचींग स्टाफ शी संवाद साधताना जिल्हाधिकारी डाँ. अभिजित चौधरी.
error: Content is protected !!