गोरगरीब रूग्णांचे आधार केंद्र प्रकाश हाॅस्पिटल – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

इस्लामपूर /ताः 4/जितेंद्र पाटील

     आजची आरोग्य उपचार पध्दत ही सर्वसामान्य जनतेला परवडणारी नसुन ,अर्थिक वेदना देणारी आहे . या परिस्थितीत सेवाभाव जपत प्रकाश हाॅस्पिटल हे गोरगरीब रूग्णांसाठी आधार बनले आहे . अनेक रूग्णांच्या अर्थिक वेदनेची जाणीव ठेवुन शारिरीक वेदना दुर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रकाश हाॅस्पिटल प्रशासन करत आहे .असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील (दादा) यांनी व्यक्त केले.
उरूण-इस्लामपुर शहरातील प्रकाश शिक्षण मंडळ संचलित प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर या ठिकाणी कोविड तपासणी व उपचार केंद्र सुरु करण्यात आले . त्याचे उद्घ घाटन् भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी ते बोलत होते.

इस्लामपूर येथील प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर या ठिकाणी कोविड तपासणी व उपचार केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी आ. चंद्रकांतदादा पाटील, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, प्रसाद पाटील व अन्य मान्यवर …..

         आ.चंद्रकांतदादा पाटील (दादा) म्हणाले,कोरोना सारख्या अदृष्य विषाणू ने संपुर्ण जगाचे वेळापत्रक कोलमडले असुन याचा सर्व स्तरातील घटकावरील जीवनावर विपरित परिणाम झाला आहे.सरकार व प्रशासन यांच्यावरील ताण वाढत चालला आहे . यामुळे खाजगी हाॅस्पिटलचा त्यांना आधार घ्यावा लागत आहे..कोरोनाचे संकट हे संपुर्ण देशावर आले असले तरी प्रत्येकाने या लढाईत देशसेवक म्हणून उतरले पाहीजे, प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळली पाहीजे . या लढाईत आपण निश्चित विजयी होऊ.भाजपा पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या लढाईसाठी विविध मास्टर प्लॅन बनविले आहेत . काही धारावी सारखे प्लॅन यशस्वी ही केले आहेत . ही लढाई देशसेवक म्हणुन आम्ही लढत आहोत . तसे प्रत्येकाने लढले पाहीजे.आज कोरोनाच्या लढाईत शासन व प्रशासनाच्या हाकेला ओ देत कोवीड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी समाजहीत व सेवाभाव जपला आहे.
            निशिकांतदादा हे स्वच्छ व निर्मळ मनाचे व्यक्तीमत्व असुन त्याच्या कर्तृत्वात व विचारात सेवाभाव आहे . त्यांनी शिक्षण व आरोग्य सारख्या पवित्र क्षेत्रात मोठे काम उभा केले आहे . याच बरोबर वाळवा तालुका असेल किंवा सांगली जिल्हा असेल यावर कधी संकट आले . तर निशिकांतदादा व त्यांचे कार्यकर्ते नेहमीच मदतीला धावुन येत असतात . गेल्यावर्षीचा महापुर असेल किंवा इस्लामपुर शहरावरील यावर्षीचे कोरोनाचे संकट असेल यामध्ये त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम हे देशसेवेपेक्षा कमी नसुन त्यांनी शहरावर आलेल्या कोरोनाचे संकट परतवुन लावण्यात यश मिळविले आहे . हे त्यांच्या नियोजनाचे व कर्तृत्वाचे कौतुक आहे . व प्रकाश हाॅस्पिटल मधील सेवासुविधाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी स्वागत व प्रास्थाविक प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरचे संस्थापक,उरूण- इस्लामपुर नगरपरीषदेचे नगराध्यक्ष व भाजपाचे सांगली जिल्हा माजी उपाध्यक्ष निशिकांत भोसले -पाटील (दादा) यांनी केले.यावेळी हाॅस्पिटल मधील सेवासुविधेची माहीती डाॅ.अभिमन्यु पाटील यांनी दिली.
           यावेळी प्रकाश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव,माजी आ.भगवानराव सांळुखे,वाळवा तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष प्रसाद पाटील (दादा), भाजपा शहरध्यक्ष अशोकराव खोत,जेष्ठ नेते मधुकर हुबाले,भाजपाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोरे,वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रविण माने,संदीप सावंत,संजय हवलदार, यदुराज थोरात, गजानन पाटील,विश्वजीत पाटील,रोहीत चिवटे,विपुन कुलकर्णी,ह.भ.प.निशिकांत शेटे,वाहीद मुजावर,सागर जाधव आदिसह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

error: Content is protected !!