चंदुर / ता : ८ – प्रतिनिधी

कोरोनामुळे निवडणूका वेळेत न झाल्यामुळे शासनाने सरपंचपदी प्रशासक म्हणून ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा अनुभव असलेले शासकीय अधिकारी यांची नेमणूक केली आहे. सध्या काम करीत असताना ग्रामपंचायतीच्या कामकाजावर लक्ष असायचे . परंतू आता प्रत्यक्षात सरपंच प्रशासक म्हणून संधी मिळाली आहे. असे सांगुन चंदुर येथे काम करत असताना सभापती व सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेलच . अशी अपेक्षा चंदुरचे प्रशासक एन्.आर्. रामाण्णा यांनी व्यक्त केली.
हातकणंगले पंचायत समितीचे सभापती महेश पाटील यांनी विस्तार अधिकारी रामाण्णा हुशार व कर्तबगार आधिकारी असलेने त्यांना आम्हा सर्वांचे सहकार्य असणारच अशी ग्वाही दिली.माजी सरपंच माणिक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी सर्व सदस्य , सदस्या , ग्रामविकास अधिकारी बी. व्ही. कांबळे पोलीस पाटील राहूल वाघमोडे मंडल अधिकारी गोन्सालविस तलाठी सौ. धुत्रे आदि मान्यवर उपस्थित होते.
