प्रविण जनगोंडा व त्यांच्या मित्रपरिवार मार्फत फवारणी

हातकणंगले /ता : 24

               आळते (ता .हातकणंगले )येथे कोरोना रुग्णांची संख्या एकूण सहा झाली आहे . गावातील काही भाग कंटेनमेंट झोनमध्ये आहे . या पार्श्वभूमीवर कोरोणा रोगाचा फैलाव होऊ नये . या उद्देशाने पंचायत समितीचे सदस्य श्री प्रवीण जनगोंडा व त्यांच्या सहकारी मित्रांनी काही भागांमध्ये ट्रॅक्टरने निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी केली .

            औषध फवारणी ही पूर्णपणे स्व:खर्चाने व काही मित्रांच्या सहकार्याने तसेच नाम . राजेंद्र पाटील (यड्रावकर) व हातकणंगले पंचायत समितीचे उपसभापती राजकुमार भोसले यांच्या सहकार्यातून केले आहे . त्याचबरोबर पं . स . सदस्य जनगोंडा यांनी वैयक्तिक स्तरावर सॅनीटायझरचे वाटप सुद्धा केले आहे . यावेळी त्यांनी गावातील जनतेने स्व:तासह कुंटुंबाला सांभाळून घरी बसून ही कोरोणा फैलावची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे .

आळते येथे औषध फवारणी करताना पं .स. सदस्य प्रविण जनगोंडा व अन्य मित्रपरिवार

error: Content is protected !!