टोप येथील बिरदेव यात्रेची जय्यत तयारी सुरु

टोप

टोप येथील बिरदेव जरळ यात्रा गुढी पाडव्यापासून सुरु होत आहे. आपली यात्रा आपली जबाबदारी अशी भुमिका घेऊन यात्रेची जय्यत तयारी सुरु झाली आहे. पोलिस निरिक्षक पंकज गिरी यांनी नुकतीच ग्रामस्थांसमवेत बैठक घेऊन यात्रेचा आढावा घेतला.
पालखी मिरवणूक, भाविकांना दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगा, पार्किंग व्यवस्था, पाणी पुरवठा व्यवस्था, प्राथमिक उपचारासाठी आवश्यक सुविधा याबाबत माहिती घेतली. आणि ग्रामस्थांना आवश्यक त्या सुचना केल्या. यानंतर आणखीन दोन दिवसात पुन्हा बैठक घेऊन आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला बिरदेव मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!