अतिग्रेत क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

हातकणंगले / प्रतिनिधी
    अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर युवा मंच यांच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त भव्य हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ हातकणंगले तालुक्याचे भाजप- जनसुराज्यचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते करण्यात आले.

     यावेळी अतिग्रे गावचेचे माजी उपसरपंच संदीप सूर्यवंशी, खोची गावचे माजी उपसरपंच अमरसिंह पाटील, युवा नेते रोहन पाटील, युवा उद्योजक संग्राम जाधव, अमित शिंदे, सुरज पाटील, अजित पाटील, शुभम कांबळे उपस्थित होते. स्पर्धेमधे प्रथम क्रमांक काळा चौक कोरोची यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक वारणामय कुंभोज यांनी तर तृतीय क्रमांक खंडोबा कुंभोज यांनी पटकावला. स्पर्धेचे आयोजन मिलिंद कांबळे, अमित होवाळे, मदन मधाळे, समीर शिंदे यांच्या टीमने केले होते .

error: Content is protected !!