घोडावत विद्यापीठाचे प्रा.इंद्रजीत कांबळे यांना इंग्रजी विषयात पीएचडी जाहीर

अतिग्रे:संजय घोडावत विद्यापीठातील इंग्रजी विषयाचे प्रा. इंद्रजीत आप्पासाहेब कांबळे यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी पदवी जाहीर करण्यात आली.
‘द इमेज ऑफ इंडिया इन द वर्क ऑफ जिम कार्बेट:स्टडी फ्रॉम ओरिएंटेलेस्टिक परस्पेक्टीव्ह’ या विषयावर त्यांनी शोध प्रबंध सादर केला. एडवर्ड सईद यांच्या सिद्धांताचा उपयोग करणारा वसाहतीनंतर च्या काळातील हा एकमेव शोध प्रबंध आहे. सदर विषयात नव्याने संशोधन करू पाहणाऱ्यांना हा शोध प्रबंध दिशादर्शक ठरणार आहे.
देवचंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.जी.डी. इंगळे यांनी पीएचडी गाईड म्हणून मार्गदर्शन केले.शिवाजी विद्यापीठाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.प्रभंजन माने यांनी प्रोत्साहन दिले. संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले,कुलगुरू प्रो.उद्धव भोसले, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस चे डिन डॉ.उत्तम जाधव आणि सहकारी प्राध्यापकांनी पीएचडी बद्दल प्रा.इंद्रजीत कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!