प्रा. तृप्ती बनसोडे यांना संगणक शास्त्र विषयातील पीएच. डी. पदवी प्रदान

इचलकरंजी – प्रा. सौ तृप्ती प्रकाश बनसोडे यांनी संगणक शास्त्र विषयातील पीएच. डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या प्रबंधाचा विषय “डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ स्मार्ट लर्निंग एन्व्हायरमेंट बेस्ड ऑन ऑगमेंटेड रियालिटी” हा आहे.
सदर प्रबंध त्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे पीएच. डी. पदवी साठी सादर केला होता. त्यांनी विद्यार्थी केंद्रीत अध्यापन करण्यासाठी ऑगमेंटेड रियालिटी म्हणजेच वर्धित वास्तविकता या तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग व्हावा या हेतूने उपयुक्त संशोधन केले आहे. सदर तंत्रज्ञानाचा उपयोग हा महाविद्यालयीन स्तरातील रसायनशास्त्र व गणित विषयातील अवघड संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी होणार आहे.
या संशोधनासाठी त्यांना शिवाजी विद्यापीठातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. आर. व्हीं. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी त्यांनी पीएच.डी. ही संशोधनाची प्रथम पायरी आहे, असे मनोगत व्यक्त केले. प्रा. तृप्ती बनसोडे या सांगोला महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रकाश अरुण बनसोडे यांच्या सुविद्य पत्नी आहेत. येथील चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीचे संचालक शामल सातपुते यांच्या त्या कन्या आहेत. सदर यशासाठी त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!