गारगोटी /प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मराठा समाजाला राज्य शासनाने दिलेले आरक्षण रद्द केलेच्या निषेधार्थ भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने अर्धनग्न होऊन आंदोलन करण्यात आले. येथील क्रांती ज्योतीजवळ सोशल डिस्टशिंग पाळून हे आंदोलन करण्यात आले.

गारगोटी येथे मराठा आरक्षण रद्द केलेचे निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने अर्धनग्न आदोलन करणेत आले. आंदोलनात प्रविणसिंह सावंत, सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे, सम्राट मोरे , पार्थ सावंत ,शरद मोरे, सदींप पाटील, सचीन भांदीगरे , सतिश जाधव, राहूल चौगुले, नितीन बोटे, स्वप्नील साळोखे, कृष्णा गोरे, संजय रेडेकर, उदय भोसले रमेश पाटील , अनिल देसाई आदी उपस्थित होते.