ब्लॅक पँथर’तर्फे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

बिंदू नामावलीसह शासनाच्या अनेक नियमांचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे मुख्याध्यापक व शिक्षकांना मान्यता देणारे शिक्षणाधिकारी तसेच दलित वस्ती निधीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईसाठी ‘ब्लॅक पँथर’तर्फे गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

अपात्र शिक्षकांची वरिष्ठ श्रेणीमध्ये निवड करणे, अनेक गावांमध्ये दलित वस्ती योजनेतील खर्च दलित वस्तीमध्ये न करता अन्यत्र खर्च करण्यात आला आहे. शिष्टमंडळात पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई, नामदेव कांबळे, पंडित कांबळे, प्रकाश कांबळे, आनंदा सातपुते, स्वप्निल देसाई, दीपक कांबळे आदींचा समावेश होता.

error: Content is protected !!