पुष्पनगरमध्ये एकाच कुटूंबातील सतरा जण पॉझिटिव्ह ,गाव समूह संसर्गच्या छायेत ; भुदरगड तालुक्याची रुग्ण संख्या १३८

गारगोटी / ता :१ ( आनंद चव्हाण)

       भुदरगड तालुक्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असून तालुक्यातील पुष्पनगर गावात एकाच कुटूंबातील सतरा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत . गावातील दोघांचा मृत्यू झालेने खळबळ माजली आहे . दोघेही सेवानिवृत्त होते . या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पुष्पनगर गावातील ७७ व्यक्तींना आज क्वांरन्टाईन करणेत आले असून या सर्वांचे स्वॅब घेणेत आले आहेत. गावासह आसपासच्या गावात भितीचे वातावरण आहे.समूह संसर्गाची भीती व्यक्त होत आहे.तर आज दुपारी गारगोटी येथील एका कॉलनीतील ३५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आठ तर तालुक्याची संख्या १३८ झाली आहे.
      गारगोटी पासून चार किलोमीटर अंतरावर पुष्पनगर हे दोनअडीच हजार लोकवस्तीचे वेदगंगा नदीच्या काठावर वसलेले गाव आहे . गाव पुर्णतः बागायत जमिनीचे असून अतिशय समृद्ध गाव आहे. गावातील एका गल्लीतील गेल्या चार दिवसांपूर्वी ताप,सर्दीचा त्रास जाणवू लागल्यानंतर चार व्यक्तींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते, त्यातील तिघांना श्वसनाचा त्रास होत असलेने त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवले होते . त्यापैकी काल दुपारी दोघांचा मृत्यू झाला, त्यातील एक जण ७२ वर्षीय जिल्हा बँकेतून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले होते . तर दुसरे व्यक्ती ७३ वर्षीय असून सेवा संस्थेची सेवानिवृत्त सचिव होती,
       काल गुरुवारी या कुटूंबातील१३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता .त्यात वाढ होऊन ही संख्या१७ वर पोहोचली, या बाधित व्यक्तींच्या संपर्कात गावातील अनेक व्यक्ती आलेने गाव हादरले आहे . आज सकाळी या गावातील संपर्कात आलेल्या व्यक्तींना आणणेसाठी दोन एस टी बसेस पाठवणेत आल्या होत्या . त्यातून ७७ जणांना गारगोटी येथील विलगिकरण केंद्रात क्वारन्टाईन करणेत आले आहे.या सर्वांचे स्वॅब घेणेत आले आहेत.गावाच्या सर्व सीमा सील केल्या असून गावात पूर्ण सन्नाटा पसरला आहे. गाव भीतीच्या छायेत आहे.

 

error: Content is protected !!