इस्लामपूर /ता : ८- जितेंद्र पाटील
येथील राजारामबापू इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी, राजारामनगर, साखराळे या महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे संस्थापक व वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते राजारामबापू पाटील यांची जयंती लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त महाविद्यालयाच्या वसतिगृह परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने व इन्फ्रस्ट्रक्चर विभागाच्या सहकार्याने होस्टेल परिसरामध्ये पहिल्या टप्यामध्ये १४० रोपांची मियावाकी पध्दतीने वृक्ष लागवड करण्यात आली. मियावाकीसाठी ओसाड जमीनीची निवड करून तेथील मुळ निकृष्ठ दजार्ची माती काढून तेथे शेणखत, गहू, भात यांचा कोंडा समप्रमाणात मिसळून त्याठिकाणी खड्डे तयार करून १४० रोपांची वृक्ष लागवड करण्यात आली. या खतांमुळे रोपांना भरपूर मूलद्रव्ये मिळतील . आणि भाताचे तूस वापरल्याने पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल. या पध्दतीमध्येमध्ये कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त शाश्वत झाडांची वाढ केली जाणार आहे. तसेच हवामान बदलास सामोरे जाण्यासाठी मियावाकी जंगल निर्मिती हा उत्कृष्ट पर्याय आहे. जपानमधील अनेक प्रयोगामध्ये सिध्द झालेले आहे. या वेळी आंबा, चिंच, लिंबू, पेरू, करंज, आवळा, उलटा अशोक, अर्जुन, भोकर इत्यादी रोपांचा समावेश आहे. महाविद्यालयामध्ये ७०० चौ.मी. जागेमध्ये मियावाकी पध्दतीने वृक्षारोपण करण्यात येत आहे. यापैकी ५०० चौ.मी. मध्ये १ आॅगस्ट व १५ आॅगस्ट २०१९ रोजी वृक्षारोपन केलेले आहे. सध्या २०० चौ.मी. जागेमध्ये मियावाकी पध्दतीने वृक्षारोपण करण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरूवात महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.एस.एस.कुलकर्णी, डीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.पी.एम.मोहिते, डीन, स्टुडंट डेव्हलपमेंट डॉ.एल.एम. जुगुलकर, डीन डिप्लोमा डॉ.एच.एस.जाधव, डॉ.एस.आर.पाटील, डॉ.ए.पी.शहा यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी डॉ.पी.डी.कुंभार, डॉ.एस.एन.यादव, डॉ.मनिषा जगताप, प्रा.प्रकाश जाधव, प्रा.राहुल पाटील, प्रा.अरूण थोरात, विश्वास हासे, प्रा.सी.ए.वाघमारे, एस.आर.पाटील, सारिका पाटील, एम.एम.पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.संदीप पाटील, बी.जी.चव्हाण, एस.एन.कुंभार हे उपस्थित होते.