रब्बी हंगाम पिक व्यवस्थापन जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

    कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) :  तालुकास्तरीय कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) यांच्यासाठी रब्बी हंगाम पिक व्यवस्थापन कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे घेण्यात आली.

कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे संशोधन संचालक डॉ. अशोक पिसाळ, मका पैदासकर व प्रमुख राज्य समन्वयक डॉ. सुनिल कराड, नाचणी पैदासकर व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ योगेश बन, जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) तानाजी पाटील, जिल्हा कृषी अधिकारी (विघयो), दीपक देशमुख, कृषी अधिकारी गौरी मठपती, सर्व कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) तानाजी पाटील यांनी केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी उपस्थित सर्व कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) यांना मार्गदर्शन केले. कृषी विस्ताराचे काम प्रभावीपणे करुन जास्तीत जास्त शेतक-यांना अधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्याबाबत सूचित केले.
डॉ. पिसाळ यांनी ऊस व्यवस्थापन व रब्बी हंगाम पिकाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. कराड यांनी मका लागवड तंत्रज्ञान व चारा पिक व्यवस्थाबाबत मार्गदर्शन केले.
रा.छ.शा.म.कृषि महाविद्यालयाचे किटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अभय बागडे यांनी रब्बी हंगाम पीक किड व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले. रोगशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रवींद्र कारंडे यांनी रब्बी हंगाम पीक रोग व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. बन यांनी नाचणी लागवड तंत्रज्ञान व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्यच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी अधिकारी गौरी मठपती यांनी तर आभार जिल्हा कृषी अधिकारी (विघयो) दीपक देशमुख यांनी मानले.

error: Content is protected !!