राजारामबापू जयंती निमित्त २२५ दात्यांचे रक्तदान

इस्लामपूर / ताः८ – जितेंद्र पाटील

         राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या १०१ व्या जयंत्तीनिमित्त राजारामनगर, वाटेगाव-सुरुल, कारंदवाडी युनिट कार्यस्थळावर आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास कामगारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या शिबीरात २२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. राजारामबापू ब्लड बँक, सिध्दीविनायक ब्लड बँक मिरज, शिरगांवकर रोटरी ब्लड बँक सांगली, अर्पण ब्लड बँक कोल्हापूर आदीचे शिबिरास मोठे सहकार्य लाभले.

राजारामनगर कार्यस्थळावरील रक्तदान शिबीराच्या उदघाटन प्रसंगी कार्यकारी संचालक आर.डी. माहुली, डॉ. प्रकाश म्हाळुंगकर, महेश पाटील, संजय गुरव, संदीप कदम यांच्यासह अन्य मान्यवर …..


        राजारामनगर युनिट मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकिय अधिकारी प्रकाश महाळुंगकर, कामगार नेते शंकरराव भोसले, युनियनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, माजी अध्यक्ष तानाजीराव खराडे, कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील, मुख्य वेळपाल संजय गुरव, संदीप कदम प्रामुख्याने उपस्थित होते. येथे १०३ कर्मचा-यांनी रक्तदान केले. वाटेगाव-सुरुल युनिटमध्ये चिफ इंजिनिअर संताजी चव्हाण व डाँ. गाढवे यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी चिफ केमिस्ट संभाजी सावंत यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थिती होती. येथे ५७ कर्मचा-यांनी रक्तदान केले. कारंदवाडी युनिटमध्ये संचालक प्रदीपकुमार पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. जितेंद्र पत्की, चिफ केमिस्ट उमेश शेटे, डे. चिफ इंजिनिअर संग्राम चव्हाण, डॉ. जयपाल तांबगावे, गणेश यादव, बाबासाहेब चौगुले उपस्थिती होती. येथे ६५ कर्मचा-यांनी रक्तदान केले.

error: Content is protected !!