इस्लामपूर [ता/29]/ जितेंद्र पाटील
येथील राजारामबापू पाटील मिलिटरी स्कुल अॅन्ड स्पोर्टस् अॅकॅडमीचा इयत्ता १० वी चा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये साक्षी तानाजी ताटे ९३ टक्के, प्राची महादेव पाटील ९१ टक्के, विराज जगदीश जाधव ९० टक्के यांनी गुणप्राप्त करत अनुक्रमे क्रमांक पटकावले.
या विद्यार्थ्यांचे संस्थापक विनायकराव पाटील, सचिव मनिषाताई पाटील,अशोक करे, सुहास तळेकर, मुख्याध्यापिका सुनिता भोईटे, आशाराणी खोत, प्रतिभा कुंभार, सुवर्णा पवार, स्वाती शिंदे, शमा वलांडकर, प्रशांत मोहिते, दिपक सुतार, संग्राम डोईफोडे, दिपाली पाटील यांनी अभिनंदन केले.

९३ टक्के

९१ टक्के

