हातकणंगले पोलीस ठाण्यात रक्षाबंधन साजरा

पोलीसाना कोणतेही सण साजरा करता येत नाहीत, ना कुंटूबासमवेत जास्त काळ रहाता येत नाही, फक्त डूटी म्हणजे डूटी जनतेच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध राहतात, आज बहिण भावाचा महत्वाचा सण रक्षाबधंन, आपल्या सख्या बहिणेकडे जाता नसल्यामुळे व डूटी असणाऱ्या भगिनीना आपल्या भावाकडे जाता येत नाही म्हणून आज हातकणंगले पोलीस ठाण्यामधील महिला कर्मचारी भारती मोहीते, स्वाती हिप्पकर, रोहणी काटकर या पोलीस भगिनीनी ड्युटीवर असणाऱ्या सर्व पोलीस भावांना औक्षण करून राखी बांधली आजचा तो क्षण फार भावूक झाला होता पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर जाणवत आनंदाच्या छ्टा चेहऱ्यावर दिसत होत्या.

परि. पोलीस उप अधिक्षक श्री रविंद्र भोसलेसाहेब यांनी हातकणंगले पोलिस स्टेशन मध्ये प्रथमचं साजरा केला रक्षाबंधन…


यावेळी प्रोबेशनरी पोलीस उपअधिक्षक रविंद्र भोसले, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कांबळे,माच्छिद्रं पटेकरी, सुरजानंद च०हान, हेमत खरोशी, संदीप कांबळे, सागर पाटील, गणेश खरजे, कुलदिप मोहीते,कमरुजमा मकानदार, विकास घस्ते, विजय मगदूम यांनी राखी बांधून घेतली.
हातकणंगले पोलीस ठाण्यात साजरी झालेली अनोखी रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा आमच्यासाठी फार महत्वाचा आहे, हा दिवस आमच्यासाठी फार मोठा असून आमच्या कायम लक्षात राहील अशी प्रतिक्रिया सर्व पोलीस कर्मचारी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!