रामलिंग आळते येथील जल , माती जाणार अयोध्येला

आळते / वार्ताहर

               श्री . प्रभु रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या आळते ( ता.हातकणंगले ) डोंगरातील रामलिंग मंदिराच्या परिसरातील जल व माती अयोध्या येथे राम मंदिराच्या पायाभरणीसाठी पाठविण्यात येणार आहे . प्रभु रामचंद्र यांचे वनवास काळामध्ये येथे काही काळ वास्तव्य होते . त्याकाळी प्रभुनी डोंगरात धनुष्यबाण मारून पाण्याचा जिवंत झरा काढला होता . तेव्हापासुन आजतागायत झऱ्यातुन पाण्याचा उमाळा सुरू आहे .

          श्री . प्रभु रामचंद्र यांनी स्थापन केलेले शिवलिंग


               याच झऱ्याचे पाणी येथील माती सोमवारी सकाळी अकरा वाजता रामलिंग येथील शिवपिंडीला अभिषेक घालून अयोध्येकडे रवाना करण्यात येणार आहे . प्रभू रामचंद्र चौदा वर्षे वनवासात असताना हा परिसर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे येथील शिवलिंगाची त्यांनी स्थापन केली असून पूजेसाठी त्यांनी मारलेल्या धनुष्यबानातून शिवपिंडीवर सतत जलाभिषेक होत असतो . पाच ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची पायाभरणी होत आहे . यासाठी देशभरातून ऐतिहासिक भूमीवरील जल व माती संकलित केली जात आहे . कोल्हापूर जिल्ह्यातील रामलिंग या ऐतिहासिक भूमीतून सोमवारी जल आणि माती पाठवण्यात येत आहे . भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष मा . आमदार सुरेश हाळवणकर जिल्हा परिषदेतील भाजपाचे गटनेते अरुणराय इंगवले यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे . प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत हे जल व माती आयोध्येला पाठवण्यात येणार आहे .

error: Content is protected !!