जय श्रीराम… जयघोषात जल व माती रामलिंगहुन अयोध्येला रवाना

हातकणंगले / ताः २७

           जय श्रीराम च्या जयघोषात श्री क्षेत्र रामलिंग येथील ऐतिहासिक भूमीतील जल व माती श्री राम मंदिराच्या पायाभरणीसाठी विधीवत पूजा करून रामभूमी आयोध्येला पाठविण्यात आली. गुरु प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे

       जय श्री राम च्या जयघोषात जल व माती पूजन करताना हिंदूराव शेळके , अरूणराव इंगवले व मान्यवर..

               आज सकाळी अकरा वाजता रामलिंग येथील शिवपिंडीला अभिषेक घालून येथील जल व माती अयोध्या कडे रवाना करण्यात आली. प्रभू रामचंद्र १४ वर्षे वनवासात असताना हा परिसर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे . येथील शिवलिंगची त्यांनी प्राणप्रतिष्ठापना केली असून पूजेसाठी त्यांनी मारलेल्या धनुष्यबाणातून शिवपिंडीवर सतत जलाभिषेक होत असतो . पाच ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची पायाभरणी होत आहे . यासाठी देशभरातून ऐतिहासिक भूमीवरील जल व माती संकलित केले जात आहे . कोल्हापूर जिल्ह्यातील रामलिंग या ऐतिहासिक भूमीतून आज विधीवत पूजा अभिषेक करून जल आणि माती पाठविण्यात आली. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हाळवणकर , जिल्हा परिषदेतील भाजपाचे गटनेते अरुण इंगवले यांनी यासाठी पुढाकार घेतला होता .प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत हे जल व माती आयोध्येला पाठवण्यात येणार आहे

            यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके , जेष्ठ जि प सदस्य अरूणराव इंगवले यांच्या  उपस्थितीत जलाभिषेक व विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थित राम भक्तांनी जय श्री राम चा जयघोष केला. यावेळी सरपंच सविता कांबळे, उपसरपंच फैयाज मुजावर, अजिक्य इंगवले , नगरसेवक राजेंद्र इंगवले, आण्णासो चौगुले, दिनानाथ मोरे, शितल हावळे , विजय हुक्कीरे , किरण गुरव, मंगल गुरव , पुजारी अमोल गुरव , विरभद्र गुरव ,मा.सरपंच संजय दिक्षीत, यांच्यासह आळते ग्रा प सर्व सदस्य ,पुजारी गुरव व परिसरातील मोजकेच रामभक्त उपस्थित होते . ग्रा पं आळते व हातकणंगले पोलीसांनी श्री क्षेत्र रामलिंग येथे कार्यक्रमासाठी गर्दी होऊ नये . यासाठी काटेकोर नियोजन केले होते .

error: Content is protected !!