शिरोळ तालुक्यातील तमदलगे येथील राष्ट्रीय विद्यालयाचा दहावीचा निकाल सलग 14 व्या वर्षी 100% लागल्याने पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे . विद्यालयाच्या सुदर्शन संभाजी हंकारे याने 87.80 % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला , तर ऋतुजा अरुण माणगांवे हिने 87 % गुण मिळवून दुसरा क्रमांक आणि आकाश अमोल परीट याने 84% गुण मिळवुन तिसरा क्रमांक पटकाविला . यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अे .एन् .पाटील यांचे व विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे .