इचलकरंजी /ताः १०
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व गुरुकुल आय.आय.टी. अँड मेडिकल अकॅडमी ,अब्दुल लाट . यांच्या संयुक्त विद्यमाने हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘बळ देऊ पंखाना ‘ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे रोटरीचे अध्यक्ष अभय येळरुटे , सेक्रेटरी दीपक निंगुडगेकर व गुरुकुल शिक्षण समूहाचे चेअरमन् गणेश नायकुडे यांनी संयुक्तपणे सांगितले
नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे . यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत . त्यांना भविष्यात चांगले शिक्षण घेण्याची खूप इच्छा आहे . परंतु कोरोना संकटामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती खुपच बिघडली असल्याने पालकांच्या समोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत . यामुळे मुलांमुलींचे शिकण्याची इच्छा स्वप्नच राहू नये . या उद्देशाने हुशार व होतकरू विद्यार्थ्यांची संधी वाया जावु नये . व उच्च शिक्षणापासुन वंचित राहु नये . या सामाजिक बांधिलकीतून साथ देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व गुरुकुल अकॅडमी यांनी नाममात्र फी मध्ये दर्जेदार शिक्षणाची संधी व सुविधा उपलब्ध करून दिली आहे . त्यामध्ये मुला-मुलीसाठी अकरावी बारावी JEE, NEET, CET, BOARD परीक्षेची वैयक्तिक तयारी करून घेतली जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी बस सेवा व निवास सेवा सुद्धा अल्पदरात उपलब्ध करून दिली जाणार आहे . तरी याचा लाभ जास्तीत जास्त मुला-मुलींनी व पालकांनी घेण्याचे आवाहन रोटरी व गुरुकुल अकॅडमी कडून करण्यात आले आहे .
उपक्रमाची माहिती घेण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.
अभय येळरुटे – 9822109522
दीपक निंगुडगेकर – 9975436969
गणेश नायकुडे – 9623226666
सचिन पुजारी – 7057005666


